सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचे आणखी दोन व्हिडिओ आले समोर
सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचे आणखी दोन व्हिडिओ समोर आले आहेत. बडगुजर यांच्या नातेवाईंकच्या फार्म हाऊसवर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची पार्टी रंगली होती. पार्टीचे आणखी दोन व्हिडिओ समोर आले आहे. नितेश राणे यांनी सभागृहात सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्तासोबतचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले होते.
विधानसभेत बोलताना नितेश राणे यांनी एक फोटो दाखवत सुधाकर बडगुजर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत काय करत होते? असा सवाल विचारत फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे. सलिम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.
एसआयटीच्या माध्यमातून वेळेत चौकशी केली जाईल. या संबंधित व्यक्तीशी कुत्ताचा काय संबंध आहे. याची चौकशी करण्यात येईल. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.