CM Uddhav Thackeray : दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल  प्रवासाचे ‘स्वातंत्र्य’

CM Uddhav Thackeray : दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाचे ‘स्वातंत्र्य’

Published by :
Published on

मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. दोन डोस घेतलेल्यांना आता येत्या १५ ऑगस्टपासून मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार आहे. दरम्यान या संदर्भात एक अॅपही तयार करण्यात आले आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान नेमके हे अॅप कसे असणार ते जाणून घेऊयात…

कसे असेल अॅप

  • लोकल प्रवासासाठी अॅपही तयार करण्यात आलेय
  • या अॅपमध्ये दोन डोस घेतलेल्यांची माहिती द्यावी लागणार आहे
  • हि माहिती त्यात दिल्यानंतर कोड जनरेट होणार आहे.
  • या कोडनुसार तिकीट कॉउंटरवरून पास मिळणार आहे.

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.

सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर  क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा असे आवाहन सरकारने केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com