सिंधुदुर्गात राणेंना मोठा झटका; 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

सिंधुदुर्गात राणेंना मोठा झटका; 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Published by :
Published on

सिंधुदुर्गातील राणे समर्थक, देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकरू आणि प्रकाश कोयडे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने सिंधुदुर्गात नारायण राणेंना शिवसेनेनं मोठा झटका दिल्याचं समजतंय.

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तसंच कणकवलीच्या माईन आणि कालमठ ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच धनश्री मेस्त्री आणि प्रज्ञा मिस्त्री यांचाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com