फक्त इंधन नाही, आता टिव्ही बघणे ही महाग
आता केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा प्रदात्यांकडून मिळवलेल्या पेड टीव्ही चॅनेलच्या ग्राहकांना नवीन टॅरिफ ऑर्डर प्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू होणार आहे.
सोनी, झी, स्टार इंडिया आणि वायाकॉम 18 सारख्या काही लोकप्रिय वाहिन्यांना याचा फायदा होणार आहे. बहुतेक लोकप्रिय चॅनेल बंडल मध्ये न देता आता एक वेगळा वैयक्तिक चॅनल म्हणून घ्यावा लागणार आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाने त्यांच्या जीईसी आणि क्रीडा वाहिन्यांचा एमआरपी १२ रुपयांच्या वर ठेवला आहे. स्टार इंडियाच्या ७८ पैकी ३२ चॅनेलची किंमत १२ रुपये कॅपच्या वर आहे. झीकडे चार चॅनेल आहेत जे फक्त वेयक्तिकरीत्या घेता येतील. वायाकॉम १८च्या दोन्ही चॅनेलची किंमत २१ रुपये आहे.
विश्लेषकांच्या मते याचा विपरीत परिणाम होउन प्रेक्षक आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स कडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फायदा टिव्ही वाहिन्यांना न होता वूट, हॉटस्टार सारख्या ओटीटी माध्यमांना होउ शकतो.