शिवसेनेचेचं खरे हिंदुत्व – सुशीलकुमार शिंदे

शिवसेनेचेचं खरे हिंदुत्व – सुशीलकुमार शिंदे

Published by :
Published on

लोकशाही न्युज नेटवर्क

"शिवसेना आज ज्या किमान समान कार्यक्रमानुसार सत्तेत आली, तेच हिंदुत्व प्रबोधनकारांना अपेक्षित होते आणि तेच खरे हिंदुत्व असल्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले आहे. पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे आयोजित प्रबोधन शतक महोत्सव आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

"शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्वाला मुरड घातली असे मला तरी वाटत नाही. कारण, किमान समान कार्यक्रम हा प्रबोधन ठाकरे यांनी वेगळ्या रुपाने आधी मांडला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनी चांगली साथ देत भाजपाला सत्तेपासून त्यांनी दूर ठेवले आहे. त्यामुळे भाजपाच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला असल्याचा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपला लगावला आहे.

पुणे हा राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा आहे आणि त्या पुण्यात आज प्रबोधनकारांची आणि शिवसेना प्रमुखांची जयंती साजरी होत आहे. ही मोठी ऐतिहासिक घटना असल्याचेही सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

उध्दव ठाकरेंचा राज्यापालांना टोला

राज्यात लॉकडाऊन असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात इंग्रजीतून खरमरीत पत्र लिहिले होते. या पत्रात राज्यपाल भगतसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचा विसर पडलाय का? असा सवाल केला होता. या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशाच पद्धतीने उत्तर दिलं आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं म्हटलं आहे. मुंबईला पीओके म्हणणाऱ्यांचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्वात बसत नाही असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com