एसटी कर्मचाऱ्यांबाबत अनिल परब म्हणाले…
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनेक दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप, इत्यादी पाहायला मिळाले. दरम्यान, राज्याचे परीवहनमंत्री अनिल परब ह्यांनी एसटी संपाशी व पर्यायाने एसटी कर्मचाऱ्यांशी निगडीत एक मोठं वक्तव्य केलं. "संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. 31 तारखे पर्यंत सर्व कामगारांनी कामावर यावे", असं ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले अनिल परब?
संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. तसेच कामगारांनी येत्या 31 मार्चपर्यंत कामागर रुजू व्हावे. सगळ्या कारवाया आम्ही आता ही मागे घेत आहोत.एसटीचा किमान पगार 25 हजार तर, कमाल पगार 60 हजारांपर्यंत आहे. भाजी विकण्याचं कारण काय? एसटीत येऊन काम करा. इतर मागण्यांवर चर्चा करत मान्य करण्यासाठी तयार आहोत. परंतु, सातवा वेतन अयोगाप्रमाणे तफावत देण्याचे मी मान्य केले नाही." असं ते म्हणाले. तर, आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबांविषयी सहानुभूती व्यक्त करत त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीने कामावर येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय:
'सध्या राज्यभरात दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. ज्या भागात शाळा आहेत, त्या मार्गावर गाड्या सोडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार इतर मार्गांवरील गाड्या संबंधित मार्गांवर वळवण्यात येतील', असं परब यांनी यावेळी स्पष्ट केलं.