St Employee Strike | ‘एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही’

St Employee Strike | ‘एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही’

Published by :
Published on

"सरकार म्हणून हातावर हात ठेवून आम्ही बसू शकत नाही. ज्याप्रमाणे कामगारांप्रती आमचं दायित्व आहे तसंच जनतेप्रतीही आहे. मी बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही, असं परीवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यावर करण्यात येत असलेल्या कारवाई कोणत्याही परिस्थिती मागे घेतली जाणार नसल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची आता कोणतीही शक्यता नसल्याचं बोललं जातंय. सुरुवातील निलंबन झालेल्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र सरकारच्या आवाहनला संपकरी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. या काळात जे कर्मचारी कामावर रुजू झाले होते, त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली गेली आहे. मात्र तरिही अनेकजण संपावर ठाम आहेत. अशांवर निलंबनाची कारवाई केली जाते आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यावर होत असलेली कारवाई मागे घेतली जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

"बडतर्फची कारवाई झाली की त्याला पुन्हा एक प्रक्रिया आहे. आम्ही लगेच बडतर्फीची कारवाई मागे घेऊ शकणार नाही. कारण आम्ही कारवाया मागे घेत असताना कामगार कामावर येत नाही आहेत. आमच्यावर कोणताही कारवाई होणार नाही असा कामगारांचा समज झाला आहे," अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

आज एकूण 174 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर शुक्रवारी 182 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान, आतापर्यंत एकूण 415 संपकरी कर्मचारी बडतर्फ झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com