कळसुबाई,हरिश्चंद्गगड परिसरात वीकएंडला पर्यटकांना बंदी; नियम मोडणारे पोलिसांच्या रडारवर

कळसुबाई,हरिश्चंद्गगड परिसरात वीकएंडला पर्यटकांना बंदी; नियम मोडणारे पोलिसांच्या रडारवर

Published by :
Published on

अकोले तालुक्यातील कळसूबाई, हरिश्चंद्र,रतनवाडी, म्राद,रतनगड या परिसरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी शनिवार-रविवार या दिवशी पर्यटकांवर बंदी घालण्याचा निर्णय स्थानिक शासनाने घेतला आहे.

नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत. यासंबंधी अधिक माहिती सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे व रजुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिलीये.

अकोले तालुक्यात पर्यंटकांची नेहमीच वर्दळ असते .पर्यटनासंबंधी निर्णय घेण्यासाठी शेंडी येथे एक बैठक पार पडली. यातवनक्षेत्रपाल डी. डी.पडवळ,अमोल आडे,सरपंच परिषदेचे पांडुरंग खाडे यांची शेंडी वन विश्रामगृह येथे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकप्रतिनिधी सरपंच,पोलीस पाटील,वन समिती यांचे अध्यक्ष सदस्य वन अधिकारी कर्मचारी व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com