टूलकिट प्रकरण : बीडपर्यंत धागेदोरे. शंतनू मुळूक यांच्या घराची झाडाझडती

टूलकिट प्रकरण : बीडपर्यंत धागेदोरे. शंतनू मुळूक यांच्या घराची झाडाझडती

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

टूलकिट प्रकरण दररोज नवीन वळण घेत आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं टि्वट केलेल्या टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलीस कारवाई करत आहेत. दिशा रवीनंतर आणखी २ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. यात मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्याबरोबरच बीड जिल्ह्यातील असलेल्या शंतनू मुळूक यांचाही समावेश आहे. याप्रकरणात पोलिसांनी शंतनू यांच्या घराची झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

दिशा रवी या तरुणीला अटक केल्यानंतर निकिता जेकब आणि शंतनू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. दोघांवर टूलकिट तयार केल्याचा आरोप आहे. मागील दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांची एक टीम शंतनूच्या कुटुंबीयांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

शंतनू यांनी दिल्ली पोलिसांच्या अटक वॉरंटविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, बीडमधील त्यांच्या घरी पोलीस नजर ठेवून आहेत. शंतनू यांच्यावर टूलकिट तयार करण्याबरोबरच खलिस्तानवादी समर्थक गटाच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com