साईबाबांच्या पुण्यतिथीचा आज मुख्य दिवस; भाविकांची शिर्डीत गर्दी

साईबाबांच्या पुण्यतिथीचा आज मुख्य दिवस; भाविकांची शिर्डीत गर्दी

Published by :
Published on

आज साईबाबांच्या पुण्यतिथीचा मुख्य दिवस असून काकड आरतीने मुख्य दिवसाला सुरुवात झाली. १०३ वा साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सव शिर्डीत साजरा होत आहे. साई समाधि मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असल्यामुळे साईबाबांच्या मंदिर व मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

पुण्यतिथी उत्सवानिमित्त साईबाबांच्या मंदिर व मंदिर परिसरामध्ये विविध फुलांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली असून आज सकाळी ९ वाजता भिक्षा झोळीचा कार्यक्रम कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com