गोंदियात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार; वनविभागाकडून ६ आरोपींना कटक

गोंदियात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार; वनविभागाकडून ६ आरोपींना कटक

Published by :
Published on

उदय चक्रधर, गोंदिया | गोंदिया जिल्ह्यात काही दिवसांपुर्वीच विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी वनविभागाने ६ आरोपींना अटक केली असून त्याच्याकडून वाघाचे दाँत, जबड्याची हाडे, इतर अवयवांचे तुकडे करणारे साहित्य ही जप्त करण्यात आले. 

गोंदिया जिल्ह्यात ११ जानेवारीला रामघाट येथे विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार करण्यात आली होती. गोंदिया वनक्षेत्र अर्जुनी मोरगाव येथे १३ जानेवारी रोजी रामघाट बिट भाग १ तारीख वन कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये मृताअवस्थेत आढळलेल्या वन्यप्राणी वाघ नर १ प्रकरणामध्ये १३ जानेवारीला रोजी वन विभाग कडून गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणी वनविभागाने  ६ आरोपींना अटक केली आहे, त्याच्याकडून वाघाचे २ सुळे दाँत, वाघाच्या जबड्याची हाडे, इतर लहान दाँत व वाघाच्या अवयवांचे तुकडे करणारे साहित्य ही जप्त करण्यात आले. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com