Amravati lightning strikes
Amravati lightning strikesteam lokshahi

अमरावती जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू; दोघे गंभीर

मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश
Published by :
Shubham Tate
Published on

अमरावती (सुरज दाहाट) :- अमरावती जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली यामध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

दर्यापूर अंजनगाव रोडवर तामसवाडी फाट्याजवळ पाऊस आल्याने झाडाच्या आडोशाला तीन जण उभे होते, या तिघांच्या अंगावर वीज पडली यामध्ये रेशमा इंगळे (वय 21) वर्ष राहणार अंजनगाव सुर्जी हिचा जागीच वीज पडून मृत्यू झाला. (three killed in lightning strikes in Amravati)

Amravati lightning strikes
भाजपचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी केलं मान्य, नवा व्हिडिओ समोर

नरेश मडवे हा गंभीर झाला आहे, दुसऱ्या घटनेमध्ये धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव येथे शेतात कपाशीची डोबनी करता गेलेला आयुष इंगळकर (वय 13) याचा देखील वीज अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे.

Amravati lightning strikes
शिवसेनेच्या फुटीला अजित पवार जबाबदार, नाना पटोलेंचं विधान

तर त्याचा सहकारी शंकर चौधरी (वय 15) हा गंभीर जखमी झाला आहे. तिसऱ्या घटनेत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वरुडा येथे शाम निरंजन शिंदे (वय 14) हा शेतात काम करण्यासाठी गेला असता त्याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यात आणखी तीन दिवस विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे जिल्ह्यात पेरणीला वेग आला असून बळीराजा मात्र दमदार पावसाने सुखावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com