महाराष्ट्र
Corona Third Wave | …तर जुलै महिन्यात तिसरी लाट येणार; आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान
बालाजी सुरवसे | महाराष्ट्र सध्या तीन टप्प्यात अनलॉंक करण्यात आला आहे. मात्र जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर महाराष्ट्रात तिसरी लाट जुलै महिन्यातच येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
उस्मानाबादमध्ये बोलताना राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दोन मतप्रवाह आहेत.काही सप्टेंबर तर काही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येईल असा मतप्रवाह असल्याचे सांगितले.
राज्यात निर्बंध कमी केल्याने गर्दी होत आहे. पण लाट रोखणे हे नागरिकांच्याच हातात आहे.स्वयंशिस्त गरजेची आहे, नियम नाही पाळले तर तिसरी लाट जुलै महिन्यातच येईल असा इशाराच त्यांनी दिला आहे. तसेच या लाटेविरुद्ध लढा देण्यासाठी औषधे व इतर व्यवस्था केली आहे.त्यासाठी लागणारी आर्थिक तरतुद 5 जुलै अधिवेशनात मान्यता दिली जाईल, असेही ते म्हणाले.