यंदा शाळांना उन्हाळ्याची सुट्टी नाही, कारण…
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. कोरोना काळात शाळा व कॉलेजेस (school and colleges) बंद ठेवण्यात आले असून ऑनलाइन शिक्षणावर (Online Education) भर देण्यात आला होता. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तर ती कमी भरून काढण्यासाठी यावर्षी शाळा व कॉलेजेस (Schools and Colleges) सुरू असणार आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाची समाधानकारक परिस्थिती दिसत होती. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस सुरू करण्यात आले होते. मागील कालावधी भरून काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिन्यात शाळा संपूर्ण उपस्थितीसह (schools open with 100%) सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात शाळा सकाळच्या सत्रात भरण्यास सुरुवात व्हायची. परंतु यावर्षी पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू असणार आहेत, असा आदेश राज्य शाळेय शिक्षण विभागाने दिला आहे.