महाराष्ट्र
Rajesh Tope |”महाराष्ट्रात कोविड नियमांत कोणतीही सूट नाही”
राज्यात ओपनिंग अपची चर्चा सुरु असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून राज्यात कोवीडच्या नियमांमध्ये कोणतीही सूट देणार नसल्याची माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर कमी असल्याचे टोपे यांनी सांगितले. सध्या राज्यातील 92 टक्के रुग्ण हे 10 जिल्ह्यात आहे तर इतर 26 जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी असल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान तिसऱ्या लाटेने शक्यतेने खबरदारी घेणे गरजेचे असल्याने कोविड नियमांमध्ये कोणतीही सूट देणार नसल्याचे टोपे म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यात इतक्यात तरी निर्बध शिथिल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाचे मुद्दे
- राज्यात कोविडच्या नियमांमध्ये कोणतीही सूट नाही
- आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवृतीची वयोमर्यादा 62
- आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा लवकर भरणार
- देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर कमी
- 10 जिल्ह्यात रुग्णांची संख्या जास्त आणि 26 जिल्ह्यात कमी
- कोरोनाचा प्रादुर्भाव कायम सुट देणे योग्य नाही
- तिसऱ्या लाटेने शक्यतेने खबरदारी घेणे गरजेचे
- 2 डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर विना राज्यात प्रवेश देण्याचा प्रस्ताव