शिर्डीतील दर्शन व्यवस्थेत तूर्तास बदल नाही – जिल्हाधिकारी

शिर्डीतील दर्शन व्यवस्थेत तूर्तास बदल नाही – जिल्हाधिकारी

Published by :
Published on

कुणाल जमदाडे, शिर्डी | अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या जरी कमी होत असली तरी राहाता तालुक्यातील रूग्ण संख्या वाढत आहे. शिर्डी येथील श्री.साईबाबा मंदीर राहाता तालुक्यात येत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याठिकाणी दर्शन व्यवस्थेत केलेले बदल तूर्तास कायम ठेवण्यात येत आहेत. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली.

शिर्डी उपविभागातील कोरोना परिस्थितीचा आज, दि.१६ रोजी आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे व गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे उपस्थित होते.

डॉ.भोसले म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिर्डी श्री.साईबाबा मंदिरात दर्शन ऑनलाईन करण्यात आले होते. तसेच प्रसादालय ही बंद ठेवण्यात आले होते. कोरोना रूग्णसंख्येचा आढावा घेऊन यात वेळोवेळी बदल करण्यात येणार होता. राहाता तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या पाहता भाविकांसाठी तूर्तास दर्शन व्यवस्था ऑनलाईनच राहील. तसेच सर्वसामान्य भाविकांसाठी प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कायम ठेवला आहे. सध्या अहमदनगर मधील २१ खेड्यांमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर ८ गावांमध्ये कंटोन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. सावळी विहीर ते शिर्डी पर्यंत असलेल्या रस्त्यांची तात्काळ दूरूस्ती करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात येतील असे डॉ.भोसले यांनी यावेळी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com