‘.तर आज मुख्यमंत्री झालो असतो’- छगन भुजबळ
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे की, शिवसेना आणि काँग्रेस सोडली नसती तर आज मी नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो असे म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
माझे अनेक सहकारी पुढे गेले. ज्यांच्या सभेत आपण भाषणं दिली, ते आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाले आहेत. मी मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री होऊ शकलो नाही पण आता त्याबद्दल खंत व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाही. असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.
शिवसेना (shivsena )सोडतानाचा काळ सर्वांत कठीण होता,पण ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी मला शिवसेना सोडावी लागली. याचे तोटेही मला सहन करावे लागले. मातोश्रीवर गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हे सांगितले होते. मुख्यमंत्रीपदापेक्षाही ओबीसींना आरक्षण मिळवून दे.
एकेकाळी काँग्रेस (CONGRESS ) नेतृत्त्वाने संपर्क करुन आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. शरद पवार यांच्याशी मी ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी एकनिष्ठ राहीलो. काँग्रेस सोडतानाही दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठीची संधी चालून आली होती. मात्र मी पवारांसोबतच कायम राहायचे ठरविले. माझी निष्ठा पवारांशी आहे. त्यांनी मला आजपर्यंत मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून खूप काही दिलं आहे.