पावसाळ्याची सुरवात झाल्याने तोरणमाळचे वातावरण अतिशय अल्हाददायक
गेल्या तीन ते चार दिवसांपासुन तोरणमाळमध्ये सकाळी ११ वाजेपर्यत धुक्याची चादर पसरलेली दिसते. पहिल्या पावसानंतर डोगऱदऱयांनी नेसलेला हिरवा गवतरुपी शालु आणि त्यातच थेट रस्त्यांवर उतरणारे धुके या मनमोहक वातावरणामुळे तोरणमाळचे सौदर्य खऱया अर्थाने खुलले आहे. सकाळी या दाट धुक्यातुन आपल्या रोजच्या दिनचर्येसाठी पायपीट करणारे आदिवासी बांधव आणि सोबतच तोरणमाळ मधील यशवंत तलावाचे देखणे सौदर्य हे पर्यटकांना आकर्षीत करत आहे.
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी देखील या सर्व दिलखुलास सौदर्यात आपल्या अधिकाऱयांसोबत मॉर्निक वॉकचा आस्वाद घेतल्याचे देखील दिसुन आले. गेली दोन दिवस विविध विषयांचा पाहणी आणि आढावा घेण्यासाठी ते नंदुरबारमध्ये असतांना तोरणमाळ मध्ये मुक्कामी होते. अद्यापही हवा तसा पाऊस झाला नसल्याने सीताखाईचा धबधबा प्रवाहीत झाला नसला तरी सध्या पर्यटकांचे पाऊल तोरणमाळकडे वळतांना दिसुन येत आहे.