राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिली पुन्हा संपाची हाक

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिली पुन्हा संपाची हाक

राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात असलेलं पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात असलेलं पाहायला मिळत आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाची हाक दिली असून 9 ऑगस्टपासून एसटी कर्मचाऱ्यांनी ही संपाची हाक दिल्याची माहिती मिळत आहे.

विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

या बैठकीनंतर बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असून आजच्या बैठकीत एसटी कामगारांच्या वेतन वाढीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे तसेच सातवा वेतन आयोगाबरोबर महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com