'शिकारी खुद शिकार हो गया' कोब्रानेच गिळले कोब्राला

'शिकारी खुद शिकार हो गया' कोब्रानेच गिळले कोब्राला

सापांच्या प्रजातीतील विषारी साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोब्रा सापानेच कोब्रा जातीच्या सापाला गिळल्याचे एक वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे
Published by :
Team Lokshahi
Published on

महेश महाले, नाशिक: अनेक जंगली प्राण्यांनी अन्य प्राण्यांची शिकार केली आहे. साप देखील बेडूक, लहान मोठ्या किड्यांची शिकार करत असतो. परंतु सापांच्या प्रजातीतील विषारी साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोब्रा सापानेच कोब्रा जातीच्या सापाला गिळल्याचे एक वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे.

ही अनोखी घटना नाशिक जिल्ह्यात असलेल्या नांदगाव तालुक्यातील बानगाव टाकळी येथे घडली आहे. नांदगाव तालूक्यातील बाणगाव टाकळी येथील शेतकरी सागर पवार हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर त्यांना विहिरीत साप दिसला.

त्यानंतर त्यांनी नांदगाव येथील सर्पमित्र विजय बडोदे यांना फोन केला. बदोडे यांनी प्रयत्न करत सापाला बाहेर काढले असता तो कोब्रा जातीचा असल्याच लक्षात आले, त्यांनी सापाला पकडताच कोब्राने आपल्याच प्रजातीच्या कोब्रा सापाला पोटातून बाहेर काढले. त्यामुळे चक्क कोब्रा सापाने भक्ष्यासाठी आपल्याच जातीच्या सापाला भक्ष्य केल्याची घटना दुर्मिळ असल्याचे सर्प मित्र विजय बदोडे यांनी सांगितले.

विहिरीतील सापाला बाहेर काढल्यानंतर त्याने पोटातून बाहेर काढलेला दुसरा कोब्रा मात्र मृत झाला होता. तर पकडलेल्या कोब्रा सापाला बडोदे यांनी बंदीस्त करत वनविभागाला माहिती देत त्याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात जंगलात सोडले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com