ओशो आश्रमातील परिस्थिती चिघळली; भक्तांचा गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज
अमोल धर्माधिकारी | पुणे : मागील काही महिन्यांपासून सातत्याने ओशो आश्रम प्रशासन आणि ओशो भक्तांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. आज शेवटी आश्रमातील भक्तांनी आक्रमक पवित्रा घेत सुरक्षारक्षकांना डावलून थेट आश्रमात प्रवेश मिळवला आहे. यावेळी ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले.
ओशो आश्रममधील जागा आणि भक्तांना माळा घालून आश्रमात आतमध्ये जाऊ दिलं जातं नव्हत. या विरोधात भक्तांकडून अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आलं होते. मागील 30 वर्षांपासून आश्रमात प्रवेश दिला जात नव्हता. परंतु, आचार्य रजनीश ओशो यांचा काल ७० वा संबोधी दिवस साजरा झाला. या निमित्ताने जगभरातून अडीच ते तीन हजार ओशो शिष्य हे कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झालेत.
इतके सगळे अनुयायी एकत्रित आल्याने त्यांनी आता ओशो आश्रमात सुरक्षारकांना डावलून प्रवेश मिळवला आहे. यानंतर काही जणांना कोरेगाव पार्क पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. अनुयायांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे बराच वेळ ओशो आश्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.