प्रतिक्षा संपली! दहावीच्या परीक्षेचा उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल होणार जाहीर

प्रतिक्षा संपली! दहावीच्या परीक्षेचा उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल होणार जाहीर

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाइन निकाल पाहू शकतात.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

बोर्डानं बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत होते. आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाइन निकाल पाहू शकतात.

1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा झाली होती. माहितीनुसार या परीक्षेला सुमारे 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थी बसले होते. यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची मंडळाची परंपरा होती. अंतर्गत प्रात्यक्षिक व मूल्यमापनाचे गुण ओएमआर शीटऐवजी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर भरल्याने निकाल एक ते दीड आठवडा अगोदर जाहीर करणे शक्य झाले आहे.

निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येईल?

●mahresult. nic. in

●sscresult. mkcl. org

●sscresult.mahahsscboard.in

●results. digilocker. gov. in

●results.targetpublications.org

या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ( http:// verification. mh- ssc. ac. in) स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी 28 मे ते 11 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com