सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : प्रियंकाविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची बहीण प्रियंकाविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर नोंदवण्यात आला होता.
गेल्या 14 जूनला सुशांतसिंह राजपूत मृतावस्थेत आढळला होता. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणी प्रियंका आणि मितू सिंह यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. सुशांतला नैराश्यावरील औषधे देण्यासाठी डॉक्टरकडून बनावट प्रिस्क्रिप्शन मिळवल्याचा दावा तिने केला होता. त्यानुसार पोलिसांनी सुशांतच्या दोन्ही बहिणी आणि एका डॉक्टरविरोधात एफआयआर दाखल केला होता. प्रियांका आणि मितू यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती. 15 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने मितूविरुद्धचा एफआयआर रद्दबातल केला होता. मात्र प्रियांकाविरुद्धचा एफआयआर कायम ठेवला. याविरुद्ध प्रियंकाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली.