मंदिरं सुरू करण्यास सरकारनं परवानगी द्यावी, अन्यथा…

मंदिरं सुरू करण्यास सरकारनं परवानगी द्यावी, अन्यथा…

Published by :
Published on

येत्या १५ ऑगस्टपासून सर्वात मोठा अनलॉक होणार आहे. मात्र, धार्मिक स्थळं उघडण्याबाबत सरकारनं कुठलाही निर्णय न घेतलेला नाही. मंदिरं उघडण्यासाठी सुरुवातीपासून आग्रही असलेल्या भारतीय जनता पक्षानं सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी या संदर्भात ट्वीट करून इशारा दिला आहे. 'मंदिरं सुरू करण्यास सरकारनं परवानगी द्यावी. अन्यथा, येत्या मंगळवारी आम्ही करोना नियमांचं पालन करत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार,' असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

येत्या १५ ऑगस्टपासून मुंबईतील लोकल ट्रेनसोबतच दुकाने, मॉल, हॉटेल रात्री १० पर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मंदिरं आणि चित्रपटगृहे मात्र कुलुपबंदच राहणार आहेत. त्यामुळं संबंधित घटकांमध्ये नाराजी आहे. राज्यातील मंदिरं आणि देवस्थानांवर हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. श्रावणाच्या सणासुदीच्या महिन्यात देवस्थानं उघडण्यास परवानगी मिळाल्यास या सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळं मंदिरंही नियमांसह खुली करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपनं केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com