MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तरतालिका जाहीर

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तरतालिका जाहीर

Published by :
Team Lokshahi
Published on

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा (State service) पूर्व परीक्षेची अंतिम उत्तरतलिका जाहीर झालीय, राजपत्रित गट अ आणि गट ब च्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर झाली आहे, यावेळी देखील आयोगाकडून चक्क 8 प्रश्न रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींनी (examinees) नाराजी व्यक्त केली.

गेल्या वेळी PSI, STI च्या पूर्व परीक्षेत (pre-exam) आयोगाकडून चुकीची उत्तरे प्रसिध्द करण्यात आली होती. असा विद्यार्थ्यांचा आरोप होता, या विरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयीन (Judicial) लढाई लढली, असे असून देखील आयोगाकडून चुका वाढत जात आहे. 100 पैकी 8 प्रश्न रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांचे नुकसान होणार आहे असा आरोप विद्यार्थी करत आहेत. उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) , तहसीलदार (Tehsildar) , गटविकास अधिकारी (Group Development Officer) , कक्ष अधिकारी, DYSP अशा एकूण 390 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. माफक हीच अपेक्षा आयोगाने चुका कमी करून अचूक प्रश्न प्रश्पत्रिका (Question paper) तयार केली तर यावर मार्ग निघेल आणि रद्द करण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्ना साठी 1 गुण देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी (Students) करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com