महाराष्ट्र
केंद्रीय निवडणूक आयुक्त निवड 15मार्चला होण्याची शक्यता
केंद्रीय निवडणूक आयुक्त निवड 15 मार्चला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त निवड 15 मार्चला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांची निवड करण्यात येणार आहे. पंतप्रधान यांच्यासह एक केंद्रीय मंत्री, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची समिती दोन आयुक्तांची नाव निश्चित करेल अशी माहिती मिळत आहे.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेतील समितीची त्यासाठी बैठक होणार आहे. अरुण गोयल यांनी शुक्रवारी अचानक राजीनामा दिला. तीन सदस्यीय आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे एकमेव सदस्य आहेत.