उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे तक्रार… राज्यपाल निशाण्यावर?
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ६ जूनला रायगडावरून संभाजीराजेंनी मराठा आरक्षाणासाठी आंदोलनाची हाक दिली. आंदोलन होण्याआधी मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिष्ट मंडळाने पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतली.
यावेळी मराठा आरक्षणासमवेत विधानपरिषदेच्या १२ रिक्त जागांचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींनसमोर मांडला. या रिक्त जागांवर लवकरात लवकर निवडणूक होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सुरुवातीपासूनच आग्रही आहे. तसेच राज्यपालांची तक्रार उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांकडे केली. यामुळे राज्यसरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्राला २४ हजार ३0६ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा मिळणे बाकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी विनंती केल्याचे समजते.