सोशल मीडियातून एक मदतीची हाक आणि निराधार आजींना मिळाले हक्काचे घर

सोशल मीडियातून एक मदतीची हाक आणि निराधार आजींना मिळाले हक्काचे घर

Published by :
Published on

सोशल मीडियीची ताकद काही वेगळीच असते. आपन एखादी गोष्ट पोस्ट करावी आणि ती वाऱ्याच्या वेगाहून अधिक गतीने पसरावी अशी सोशल मीडियाची खासियत आहे. सोशल मीडियात एखादी वाईट गोष्ट घडते तशी चांगली सुद्धा. अशीच चांगली घटना महाराष्ट्राच्या पैठण तालुक्यात घडली.

पैठण तालुक्यातील नायगाव या गावात मंदाबाई गाडे या वयोवृद्ध आजी राहतात. स्व:ताचे घर नसल्याने आणि कोणीही वाली नसल्याने एकट्यात राहत होत्या. पोटाची खळगी भरावी यासाठी हजार-बाराशे पगारावर शेताच काम करुन पोटाची खळगी भरायच्या पण स्व:ताचे घर नसल्याने पावसापाण्यात आश्रयाला झाडाचा आधार घेत राहात होत्या. हा प्रकार पैठणमधील रामेश्वर गार्डे या तरुणाने पाहीला आणि मित्रांच्या मदतीने सोशल मीडियावर मदतीची हाक दिली आणि मदतीचा पाऊस पडला.

सोशल मीडियावर आजीचा व्हिडीओ वायरल झाला, निराधार आजीसाठी अनेकजन आधार बनून पुढे आले. सोशल मीडियातून मदतीचा ओघ वाढत गेला आणि आजींना हक्काचे घर मिळाले.यासाठी पैठण शहरातील स्वच्छता संघ व कुटे मॅडम यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. मिळालेल्या अर्थिक मदतीतून आजींना हक्काचे व मायेचे घर,संसार उपयोगी वस्तु देण्यात आले.

आजच्या स्वार्थी जगात अशी मानवतावादी भुमिका बघायला मिळणे कठिणच आहे. सोशल मीडियातून जातीवाद,दंगल,दोन गटात हाणामारी अशा गोष्टी आपण सततच एैकत असतो पन जे समाज माध्ययमातून द्वेश पसरवतात व जे गैरमार्ग वापरतात अशांनसाठी हि घटना काहीतरी चांगली शिकवण देऊन जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com