महाराष्ट्र
SSC Exam : ऑल द बेस्ट! राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात
राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे.
राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून तब्बल 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थी देणार परीक्षा देणार आहेत. 6 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. 9 विभागिय मंडळ मार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे.
दहावी बोर्डचा पेपर दोन सत्रात पार पडणार आहे. सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता पेपर सुरू होणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.
परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. कॉपी मुक्त परिक्षेसाठी राज्यभरात 271 भरारी पथक कार्यरत असणार आहेत.