Omicron Corona | अखेर ‘त्या’ ७ जणांचा शोध लावण्यात ठाणे महापालिकेला यश; कोरोना रिपोर्टकडे लक्ष
दक्षिण आफ्रिकेतुन ठाण्यात आलेल्या ७ जणांचा शोध घेण्यात ठाणे महापालिकेला यश आले आहे. त्यामुळे ठाणेकरांचा जीव भांड्यात पडला आहे. या नागरीकांना आता एका विशेष ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्या उद्या येणार्या अहवालाकडे महापालिकेचे लक्ष लागुन आहे.
डोंबिवलीची घटना ताजी असतानाच ठाण्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आढळल्याने खळबळ उडाली होती. 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान जवळपास सात जण साऊथ आफ्रिकेतून ठाण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती ठाणे पालिका आयुक डॉ विपीन शर्मा यांनी दिली. या सातही जणांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार असुन यात पॉजिटीव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमूने जिनोम सिक्वेसींगसाठी पाठवण्यात येणार असल्याचे ठामपा आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी सांगितले होते. या सात जणांची शोध मोहीम पालिकेने सुरू केली होती.
अखेर या सात जणांचा शोध घेण्यास ठाणे महापालिकेला यश आले आहे. या ७ हि जणांचे मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. ७ पैकी २ जणांना १४ दिवसांहून अधिक दिवस झाल्याने त्या दोघांचा धोका टळला तर ५ जणांना ठाणे महापालिकेने एका विशेष ठिकाणी विलगीकरणात ठेवले आहे. दरम्याना या पाचही जणांची कोरोना चाचणी केली असुन उद्या त्यांचा अहवाल समोर येणार आहे. उद्या येणाऱ्या ५ जणांच्या अहवालाकडे पालिकेच लक्ष लागले आहे.