महाराष्ट्र
ठाण्यात पेप्सी आणि वेफर्सच्या गोदामाला आग
ठाण्यातील कोठारी कंपाऊंड येथे पेप्सी आणि वेफर्स कारखान्याच्या गोदामाला शुक्रवारी पहाटे २.२० वाजण्याच्या सुमारास आग लागली. चार तासांनी आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सहा हजार २०० चौ.फुटाच्या गोदामात पेप्सी आणि वेफर्स डिलिव्हरीसाठी भरलेली १३ वाहने उभी केली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १ फायर वाहन, २ जंबो वॉटर टँकर, २ लहान वॉटर टँकर,१ रेस्क्यू वाहन आणि एक जेसीबी बोलवले होते. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची आहे . अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.