ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टी व पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टी व पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर

Published by :
Published on

राज्यातील पूरग्रस्त तसंच अतिवृष्टी बाधितांसाठी मोठी बातमी आहे. ठाकरे सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मोठी घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात आलेल्या पूरामुळे तसंच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचं नुकसान झालं. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर केल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं.ठाकरे सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.

मदत

  • जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
  • बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
  • बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर
  • ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com