'त्या' दहशतवाद्याला करायचे होते उत्तर भारतात हल्ले; ATS तपासातून धक्कादायक माहिती समोर
पुणे : महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत मे महिन्यात पुण्यात एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. जुनैद मोहमद असे दहशतवाद्याचे नाव असून त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर येत आहे. जुनैदला उत्तर भारतात हल्ले करायचे होते, अशी माहिती मिळाली आहे.
जुनैद मोहमदला मे महिन्यात एटीएसने दापोडी येथून अटक केली होती. दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी तो काम करत होता. यानंतर एटीएसच्या तपासात जुनैदबद्दल आणखी माहिती समोर येत आहे. जुनैदला दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये हल्ले करायचे होते. उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी जुनैद अकोला येथे तयारी करत होता.
एवढेच नव्हे तर जम्मू-कश्मीरमध्ये जाऊन ट्रेनींग घ्यायची इच्छा होती. मात्र, कोरोनामुळे येथेच राहुन ट्रेनिंग सुरु होतं. इतर राज्यातही १० ते १२ जणांनाही त्याने भरती केलं होतं, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.