महाराष्ट्र
गोठ्याला लागलेल्या आगीत बैलजोडीसह दहा शेळ्यांचा होरपळून मृत्यू
गजानन वाणी | हिंगोलीच्या सेनगाव मधील खुडज गावामध्ये शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये एका बैलजोडी सह दहा शेळ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
शांताबाई मोरे ह्या मूळच्या जांभरून आंध येथील आहेत. खुडज शिवारात त्यांची शेती आहे. डोळ्यादेखत सर्व जळून खाक झाल्यामुळे शांताबाई मोरे यांचा संसार उघड्यावर आला आहे. पती भीमराव मोरे व पत्नी शांताबाई मोरे याचा घरगाडा शेतीवर चालतो. यांचे कडे 3 एककर शेती आहे. या शेतीतून काढलेले सोयाबिन, तूर, सह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सदर घटनेचा तलाठी यांनी पंचनामा देखील करण्यात आला. नुकसाभरपाई मिळावी अशी मागणी या परिवाराने केली आहे.