Maharashtra Landslide । पूरग्रस्तांसाठी तात्पुरती १० हजाराची मदत जाहीर
राज्यात आलेल्या पुरग्रस्तांना तात्पुरती १० हजाराची मदत जाहीर करण्यात येत असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय झाला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पूरग्रस्त भागातील नुकसान भरपाईबाबत चर्चा झाली. मात्र अद्याप नुकसान भरपाईचे नेमके आकडे समोर न आल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही. पंचनामे झाल्यावर पँकेज जाहीर करणार असून सध्या तात्काळ मदत म्हणून पूरग्रस्तांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
पूरग्रस्तांना नियमांच्या पलिकडे जाऊन मदत करण्याची भूमिका ठाकरे सरकारने घेतली आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत NDRF च्या निकषांपलिकडे जाऊन कशी मदत करता येईल याबाबत चर्चा झाली. NDRF च्या निकषांनुसार दिली जाणारी मदत कमी आहे. मात्र झालेलं नुकसान हे जास्त असल्याने नियम बदलून मदत दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.