धक्कादायक! शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थ्यांनीवर केला अत्याचार

धक्कादायक! शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थ्यांनीवर केला अत्याचार

शिक्षकाला नागपूर पोलिसांनी अटक केली
Published on

कल्पना नलसकर | नागपूर : शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. नागपुरात 12 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच 57 वर्षीय शिक्षकानेच अत्याचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संजय पांडे असे आरोपीचे नाव असून शाळेतच पीडितेवर तब्बल चार महिने अत्याचार करत असल्याचे तपासातून पुढे आले आहे. 

धक्कादायक! शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थ्यांनीवर केला अत्याचार
'शरद पवारांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट कापण्याची तयारी केली होती'

संजय पांडे सक्करदरा परिसरातील शाळेत गणित विषयांचे शिक्षक आहेत. याच शाळेतच पीडित विद्यार्थीनी शिकत होती. डिसेंबर 2022 ते एप्रिल 2023 दरम्यान शाळेतील सायन्स लॅबमध्ये आरोपींने पीडितेवर अत्याचार केले. यानंतर बारा वर्षीय पीडितेला पोटात दुखू लागल्याने याची माहिती तिने आपल्या आईला दिली. सुरुवातीला याकडे आईने दुर्लक्ष केलं. परंतु, नंतर आईने आपल्या मुलीला विश्वासात घेऊन आणखी माहिती विचारली असता तिने सगळा प्रकार सांगितला. या प्रकरणी सक्करदरा पोलीस स्टेशनचे पीआय धनंजय पाटील यांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून संजय पांडेला ताब्यात घेतले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com