टाटा स्टारबक्स भारतात विस्तारासाठी सज्ज; अलिबागमध्ये स्टोअरचे उद्घाटन
मुंबई : टाटा स्टारबक्सने अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरील आपल्या पहिल्या आयलंड स्टोअरच्या उद्घाटनाची घोषणा केली. स्थानिक ग्राहकांना तसेच सुटी घालवत असताना आपल्या आवडत्या स्टारबक्स कॉफी हाउसच्या चवीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना स्टारबक्सचा खास अनुभव देण्याच्या दृष्टीने स्टोअरचे हे नवीन स्वरूप विकसित करण्यात आले आहे.
अलिबाग हे मुंबईकरांसाठी सर्वाधिक पसंतीचे ‘सेकंड-होम’ स्थळ तसेच वीकेंड घालवण्याचे ठिकाण ठरत आहे. त्याचबरोबर ह्या किनारपट्टीवरील शहरामध्ये पायाभूत सुविधा तसेच आर्थिक विकासही वेगाने होत आहे. ह्या सर्व घडामोडींमुळे खाद्य-पेयांच्या वैविध्यपूर्ण अनुभवांची सुप्त मागणी आता व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे साहजिकच टाटा स्टारबक्सने अलिबागमध्ये हे नवीन स्वरूपातील स्टोअर सुरू केले आहे.
अलिबागमधील एम२एम फेरी टर्मिनल ह्या मोक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या नवीन स्टोअरमध्ये, जगभरातून आणल्या जाणाऱ्या सर्वोत्तम कॉफी बीन्स (कॉफीच्या बिया) ब्रू करून, स्टारबक्सचे वैशिष्ट्य असलेल्या सर्व प्रकारच्या कॉफी, ग्राहकांना देऊ केल्या जाणार आहेत. ह्याशिवाय स्टारबक्स काही स्थानिक पेयेही देणार आहे. ह्यांमध्ये साउथ इंडियन फिल्टर कॉफी, मसाला चाय, इलायची चाय, अनेक प्रकारचे सिग्नेचर मिल्कशेक्स आहेत. ह्यांसोबतच तंदुरी चिकन पॅनिनी सॅण्डविच, स्पाइस्ड कॉटेज चीज फोकशिया सॅण्डविच, हर्ब्ड चिकन फोकशिया सॅण्डविच आदी खाद्यपदार्थही येथे उपलब्ध असतील.