टास्क फोर्सची बैठक संपली; राज्यात निर्बंध वाढणार ?

टास्क फोर्सची बैठक संपली; राज्यात निर्बंध वाढणार ?

Published by :
Published on

राज्यातील टास्क फोर्सची बैठक संपली आहे. या बैठकीत वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे निर्बंध लावण्यासंदर्भाच चर्चा झाली. त्यामुळे आता बीच, चोपट्यांवर फिरण्यास बंदी येण्याची शक्यता आहे. यासह अनेक गोष्टींवर निर्बंध येणार आहेत. राजेश टोपे थोड्या वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

राज्यात गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. एका दिवसात कोरोना रुग्ण दुपटीनं वाढल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली होती.त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीनं कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीत वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध वाढविण्याबाबत चर्चा झाली आहे. ही बैठक आता संपली आहे.

या बैठकीत बीच, चोपट्यांवर फिरण्यास बंदी येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मॉल, मंदिर आणि सिनेमागृह या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी बंधन येण्याची शक्यता आहे. राजेश टोपे थोड्या वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com