पिकाचे पैसे न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार बोंबा बोंब आंदोलन

पिकाचे पैसे न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार बोंबा बोंब आंदोलन

Published by :
Published on

सुरेश वायभट/पैठण , प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना संचलित सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीज शेतकऱ्यांना पिकाचे पैसे अद्याप न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गळीत हंगाम बंद होवुन तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील शेवटचे 2 महिन्यांची शेतकऱ्यांची ऊसाची पैसे अद्याप पर्यंत न दिल्यामुळे 4 सप्टेंबरला सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन यांचे निवासस्थाना समोर बोंबा बोंब ' आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिला आहे.

पुढील हंगाम सुध्दा 02 ते 03 महिन्यावर येऊन ठेपलेला असल्याने आपण मागील ऊसाची थकीत बिले अदा केलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आपल्या कारखान्यास ऊस देण्या बाबत संभ्रम निर्माण झाला असल्याचे माऊली मुळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com