शिवसेना कुणाची? SC मध्ये सुनावणी लांबणीवर

शिवसेना कुणाची? SC मध्ये सुनावणी लांबणीवर

निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
Published on

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. याप्रकरणी तीन आठवड्यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

शिवसेना कुणाची? SC मध्ये सुनावणी लांबणीवर
सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर ताशेरे; म्हणाले…

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला होता. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पारडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या समोर सुनावणी पार पडली. यावेळी तीन आठवड्यांनी सुनावणी घेणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com