कुस्तीपटुंच्या आंदोलनास महाराष्ट्रातून पाठिंबा; ब्रिजभूषण सिंहांचा जाळला पुतळा

कुस्तीपटुंच्या आंदोलनास महाराष्ट्रातून पाठिंबा; ब्रिजभूषण सिंहांचा जाळला पुतळा

क्रीडा प्रेमींनी ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन केले
Published on

कोल्हापूर/ सांगली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्यापही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी संपूर्ण देशभर राष्ट्रीय खेळाडूंकडून आंदोलन होत आहे. मात्र, अद्यापही त्याची दखल घेतलेली दिसत नाही. याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटले असून सांगली, कोल्हापूरमधूल क्रीडाप्रेमींनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन केले आहे.

कुस्तीपटुंच्या आंदोलनास महाराष्ट्रातून पाठिंबा; ब्रिजभूषण सिंहांचा जाळला पुतळा
वृद्धीमान साहाचा पराक्रम! फक्त इतक्या चेंडूंमध्ये केले सर्वात वेगवान अर्धशतक

सांगलीत आज क्रीडा प्रेमींनी ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन केले. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राज्य क्रीडा संघटक संजय भोकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ब्रिजभूषण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. यावेळी अयोध्या दौरा करणाऱ्या राज ठाकरेंना याच ब्रिजभूषण यांनी विरोध केला होता. आता राज ठाकरेंनी दिल्ली मधील आंदोलन स्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, अशी मागणी यावेळी संजय भोकरे यांनी केली. या आंदोलनात खेळाडूंसह, कुस्तीपट्टू, क्रीडा प्रशिक्षक सहभागी झाले होते.

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कोल्हापुरातही महिला आक्रमक झाल्या आहेत. खासदार ब्रिजभूषण यांच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्वपक्षीय महिला एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली व महिलांनी ब्रिजभूषण विरोधात एल्गार पुकारला आहे. कोल्हापुरातील सर्वपक्षीय महिला संघर्षकृती समितीच्या वतीने ब्रिजभूषण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या आंदोलनात महिलांना पाठबळ देण्यासाठी पुरुष पैलवान मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com