TET परीक्षा घोटाळा; सुखदेव डेरेला 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

TET परीक्षा घोटाळा; सुखदेव डेरेला 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

Published by :
Published on

अमोल धर्माधिकारी | टीईटी गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. पोलीसांनी सुखदेव डेरे याला पुणे सत्र न्यायालयाने 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय माजी अध्यक्ष सुखरेदव ढेरे यांनासंगमनेर येथून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर बंगळुरू येथून जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विनकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.२०१७ पासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षांसंदर्भात कंत्राट दिल्यानंतर शिक्षण परिषदेमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे २०१७ पासून भरती झालेले उमेदार संशयाखाली आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com