केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उसाच्या एफआरपीत 25 रुपयांची वाढ

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उसाच्या एफआरपीत 25 रुपयांची वाढ

उसाच्या एफआरपीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

उसाच्या एफआरपीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उसाला आता प्रतिक्विंटल 315 ऐवजी 340 रुपये दर मिळणार आहे. ३४० रुपये प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णय घेण्यात आला आहे. 10.25 टक्के रिकव्हरी साठी 3400 रुपये प्रतिटन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

चालू हंगामापेक्षा पुढील वर्षी 8 टक्के जास्त एफआरपी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ट्विट केलं आहे. बावनकुळे म्हणाले की, सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने उसाचा दर प्रतिक्विंटल ₹315 वरून ₹340 करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मोदी सरकार कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते, याची प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा आली. या ऐतिहासिक निर्णयासाठी मी पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी, कृषिमंत्री @MundaArjunजी व केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो! असे बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com