Paper Leak | दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षण मंडळानची कडक नियमावली, ‘हे’ आहेत नियम
सचिन बडे, औरंगाबाद | राज्यातील दहावी-बारावीच्या (SSC-HSC EXAM) परिक्षेदरम्यान मोबाईल द्वारे पेपर फुटत (Paper Leak)असल्याचं लक्षात आल्यावर आता शिक्षण मंडळाने कडक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता वर्गात मोबाईल जाऊ नये, कुणाकडे ही मोबाईल नसणार नाही. अगदी संबंधित स्टाफ कडे सुद्धा याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परीक्षा सुरु असतांना केंद्रसंचालक विद्यार्थ्यांचे दप्तर वर्गाच्या बाहेर ठेवत नाहीत, त्याचा फायदा घेवून काही विद्यार्थी सोबत मोबाईल घेवून परीक्षा कक्षात प्रवेश करतात. तर काही विद्यार्थी परीक्षा सुरु झाल्यानंतर जाणीवपूर्वक उशिरा येतात, असे विद्यार्थी प्रश्नपत्रिका प्रसारीत करण्यास कारणीभूत ठरतात असे बोर्डाचे म्हणणे आहे त्यामुळं अशा विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना परीक्षा कक्षात सोडण्यात यावे. तसेच पेपर सुरु झाल्यानंतर सकाळी १०.३० वाजेनंतर येणा-या परीक्षार्थ्याची कडक तपासणी करण्यात यावी व त्याची उशिरा येण्याची कारणमिमांसा केल्याशिवाय त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देवू नये असे सांगण्यात आलाय. याबाबत संबंधितांना तात्काळ सूचना कराव्यात. जर याकडे संबंधित केंद्रसंचालक अथवा पर्यवेक्षकाने दुर्लक्ष केल्यास यातून प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची घटना घडल्यास संबंधिताविरुद्ध अतितात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, याची स्पष्ट नोंद घ्यावी. परीक्षेशी संबंधित असलेल्या कोणत्याही कर्मचा-याकडे मोबाईल असता कामा नये, असे बोर्डाने पत्रात म्हटले आहे…