राज्यात पुन्हा कठोर निर्बंध
कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने सरसकट टाळेबंदी करण्याऐवजी कठोर निर्बंध लागू के ले आहेत. ३१ मार्चपर्यंत हे सारे निर्बंध लागू राहतील, असा आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला.
सभा, समारंभांवर बंदी, ५० टक्के च कार्यालयीन उपस्थिती, विवाह समारंभाला फक्त ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.
घरून काम करण्यावरच भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समित्यांनी एका दिवसात आणि एका तासात किती भाविकांना प्रवेश दिला जाईल हे जाहीर करावे. शक्यतो ऑनलाइन नोंदणी करूनच दर्शनासाठी प्रवेश द्यावा. रेल्वेप्रवासावर मात्र अद्याप तरी निर्बंध लागू करण्यात आलेले नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. नियमभंग केल्यास कोरोना आपत्ती संपेपर्यंत ही बंदी लागू करण्यात येईल. असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नवे नियम?
- सर्व कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीस परवानगी. शक्यतो घरून काम करण्यावरच भर देण्याची सूचना.
- सभा, समारंभांवर बंदी. विवाह समारंभाला फक्त ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीस परवानगी.
- सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समित्यांनी एका दिवसात किती भाविकांना प्रवेश दिला जाईल हे जाहीर करावे.
- सर्व प्रकारची सिनेमागृहे, हॉटेलांना ५० टक्के प्रवेश क्षमतेची मर्यादा.
- नियमभंग केल्यास आस्थापनांवर करोना आपत्ती संपेपर्यंत बंदी.