मध्यप्रदेशातील प्रवेशबंदीमुळे गोंदिया एस टी आगाराला 10 लाखांचा फटका

मध्यप्रदेशातील प्रवेशबंदीमुळे गोंदिया एस टी आगाराला 10 लाखांचा फटका

Published by :
Published on

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातील बसेसला लावलेली प्रदेश बंदी आणखी वाढवली असून एप्रिलपासून असलेल्या बंदी मुळे 10 लाख रुपयांचा फटका गोंदिया एस टी महामंडळा बसत आहे. एप्रिल 2021 पासून असलेली बंदी सुरुवातीला 21 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. मात्र,ती आता 28 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे.

अशातच 4 महिन्यापासून प्रवेश बंदी असल्यामुळे एसटी आगाराला दरमहा सुमारे अडीच लाख असा तब्बल 4 महिन्यात 10 लाख रुपयांच्या फटका बसला आहे. मध्य प्रदेश राज्यातील सिमा गोंदिया शहरापासून सुमारे 18 किलोमीटर असून मध्य प्रदेशाच्या जनतेसाठी गोंदियाची बाजारपेठ "मिनी मुंबई" ठरली असल्याने खरेदी साठी गोंदियात येत असतात. त्यामुळे बालाघाट ते गोंदिया जिल्हातील नागरिक ये-जा करतात. मात्र मध्य प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे दोन्ही राज्याच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com