राज्य सरकारचा मोठा निर्णय! रामलल्ला प्राणप्रतिष्ठानिमित्त सुट्टी जाहीर
नवी दिल्ली : राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी देशभरात जोरात सुरू आहे. अशातच, केंद्र सरकारने सरकारी कार्यालयांना अर्धावेळ सुट्टीची घोषणा केली होती. यापाठोपाठ आता राज्य सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात उत्सव साजरा केला जाईल. यानिमित्ताने 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहिर करण्याची मागणी करण्यात येत होती. यानंतर आज राज्य सरकारने 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहिर केली आहे. तर, केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी दुपारी अर्धवेळ कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे 22 जानेवारी रोजी भारतातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापने 2:30 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता होणार आहे. 17 जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची मूर्ती आणण्यात आली होती. आज विशेष पूजा करुन गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अशातच, रामलल्लाचे संपूर्ण चित्र समोर आले. ही मूर्ती दिसायला खूपच अप्रतिम आहे.