ST Employee Strike | सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे निधन

ST Employee Strike | सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे निधन

Published by :
Published on

संजय देसाई, सांगली | राज्यात सूरू असलेल्या असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही आहे. त्यात एसटी कर्मचारी देखील आंदोलनातून पीछेहाट घेत नाही आहे. त्यात आता सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे निधन झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होऊ लागले आहे.सांगलीतही गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. आता या संपावर असणाऱ्या एका एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर याठिकाणी राहत्या घरामध्ये राजेंद्र पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला,आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. राजेंद्र निवृत्ती पाटील,वय 47 असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.पाटील हे सांगली आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत होता.

मिरज तालुक्यातल्या कवलापूर या ठिकाणी राहत्या घरी राजेंद्र पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला,त्यामुळे त्यांचं निधन झाले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये खळबळ उडाली आहे.तरी या एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक व एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com