एसटीच्या दोन हजार इलेक्ट्रिक बस;लवकरच प्रवाशांच्या सेवेत
इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्याच पार कमबरडं मोडलय.नागरिकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनाकडे वाढताना दिसतोय.त्यातच राज्यशासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवण्यास मान्यता दिल्यानंतर एसटी महामंडळानेही राज्यात इलेक्ट्रिक बसगाड्या चालवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. राज्यात भाडेतत्त्वावर तब्बल दोन हजार इलेक्ट्रिक बस (नियते) चालवण्याचे नियोजन करण्यात येत आहे
मराठवाड्याला ३८९ तर औरंगाबादला ९८ बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. नवीन धोरणानुसार आगामी काळात राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला राहणार आहे.यासाठी मोठ्या प्रमाणात ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचे हे धोरण आहे. एप्रिल २०२२ पासून शासकीय ताफ्यात ई- वाहनांचा सामावेश राहील. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीही तयार करण्यात आली आहे.
औरंगाबाद ९८, बीड ५८, जालना २०, लातूर ६२, नांदेड ७०, उस्मानाबाद ३७, परभणी ४४, मुंबई २४, पालघर ६२, रायगड ५७, रत्नागिरी १०४, सिंधुदुर्ग ५५, ठाणे ७३, नागपूर ६५, भंडारा ५५, चंद्रपूर ३४, गडचिरोली ३५, वर्धा २८, पुणे ११५, कोल्हापूर १११, सांगली १०४, सातारा ८५, सोलापूर ९७, नाशिक ९३, धुळे ८२, जळगाव ८५, नगर ९३, अकोला ०७, अमरावती ५०, बुलडाणा ६०, यवतमाळ याप्रमाणे दोनशे बस चालवण्यात येणार आहेत.