महाराष्ट्र
एसटी संपकरी राज ठाकरेंची भेट घेणार
एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.कारण एसटी आंदोलनावरुन भाजप विरूद्ध सरकार असा संघर्ष पेटताना दिसतो आहे. दरम्यान यात आता एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या भेट घेणार आहेत.
भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. तर मनसेने सुद्धा या संपाला पाठिंबा दिला होता. मात्र मनसेचा एकही पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाला नाही. आता एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ 'कृष्णकुंज'वर धाव घेणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता ते दाखल होणार आहेत.
दरम्यान आज कृती समितीची परीवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत ही संपावर तोडगा निघाला नाही. उद्या गुरूवारी पुन्हा बैठक होणार आहे.